Ganapati Festival 2025
नमस्कार मंडळी,
गणपती बाप्पा मोरया!
आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधून न्यू इंग्लंड मराठी मंडळाचा गणपती उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे!
आपल्या सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!
दिनांक: शनिवार, २० सप्टेंबर २०२५
स्थळ: J. Everett Collins Center for the Performing Arts, 100 Shawsheen Rd, Andover, MA 01810
वेळ: 11 am to 8 pm (Detailed timeline coming soon )
कार्यक्रमाची रुपरेषा:
- गणपती पूजन व आरती : पारंपरिक पद्धतीने गणरायाची पूजा व आरती
- ढोल-ताशा मिरवणूक : NEMM Josh पथक घेऊन येत आहे उत्साहवर्धक मिरवणूक ढोल, ताशा, लेझीम आणि झांजांच्या गजरात बाप्पा ची मिरवणूक!
- सांस्कृतिक कार्यक्रम : तेजस्वी तारे दख्खनचे
या वर्षीच्या प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या समुदायातील कलाकार घेऊन येत आहेत एक विशेष सादरीकरण – “तेजस्वी तारे दख्खनचे”. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना वाहिलेला आहे. तेजस्वी तारे दख्खन चे या सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्र ने भारताला आणि त्याद्वारे संपूर्ण मानवतेला दिलेल्या अमूल्य योगदानांचे प्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या सांस्कृतिक समृद्धी आणि भौगोलिक वैविध्य प्रदेशाच्या आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक सुब्बतेचा पाया रचला आहे. ही चेतना आपल्याही मनात जिवंत राहावी म्हणून आपण साहित्य, कला, संगीत विज्ञान, शिक्षण, प्रबोधन आणि समाजकारण यासारख्या विविध क्षेत्रातील थोर विभूतींच्या कार्याचा मागवा घेणार आहोत- विविध नृत्य, गीत, दृकश्राव्य, आणि नाट्याच्या सादरीकरणातून. या कार्यक्रमात आपल्या न्यू इंग्लंड भागातील सर्व वयोगटातील मंडळींचा सहभाग आहे. चला तर मग आपण आपल्या समृद्ध मराठी सांस्कृतिक परंपरेचा आस्वाद घेत आपल्या मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि गौरवशाली इतिहासाचा जल्लोष साजरा करूया.
सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करावा ही आमची नम्र विनंती.
आणि कार्यक्रमानंतर…
आपण सर्वांसाठी खास रुचकर महाराष्ट्रीयन जेवण, आणि अर्थातच – उकडीचे मोदक!
आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!
कार्यक्रम तुमच्या अनेकांच्या मदतीनेच यशस्वी होतो. मदतनीस म्हणून नोंदणी करण्यासाठी sahil.nalawade@nemm.org ला ई-मेल करा
वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.
धन्यवाद!
आपली,
NEMM २०२४-२५ समिती