NEMM Announcements

NEMM Gudhi Padva 2019

नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा २०१९ मध्ये NEMM घेऊन येत आहोत मराठी नाटक

 

        
 

नाट्यरंग बोस्टन प्रस्तुत अभिराम भडकमकर  लिखित ,

"प्रेमपत्र"

'नेहमीच्याच रंगमंचाला एक वेगळा आयाम देणारा प्रयत्न'

 

  -:कार्यक्रमाची इतर  आकर्षणे :-

 

  • महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी प्रथमच  शोभा यात्रा "
  • अभिनव उपक्रम "Real Estate Information Session"

 Excellent opportunity for First Time Home buyer and Real Estate Investors

  • सामाजिक बांधिलकी  Canned Food Drive", Expecting support from our NEMM members by bringing 2-4 canned food items (please check expiry date)
 
  • NEMM च्या "Lifetime " आणि२५ वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार समारंभ. As our database is not 100% correct on 25+ year NEMM members, requesting everyone to notify those senior members at This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • अनेक वर्षांनी पुन्हा एकदा  घेऊन येत आहोत"पाक कला स्पर्धा"  
  • मुलांसाठी करमणूक " गुढी पाडवा Special Kids Activities"
Registration @1:30 pm
शोभा यात्रा@2:45pm to 3:15 pm
Real Estate information Session @ 2:00 pm - 2:45 pm
सत्कार समारंभ @ 3:15 to 3:45 pm
पाक कला स्पर्धा @ 2:00 pm to 4:00 pm
नाटक @  3:45 to 6:30 pm
Anand Bazaar and Food Vendors @ 2:00 pm to 6:00 pm
गुढी पाडवा craft and kids movie @ 3:45pm
 
To Register($5/Entry) for पाक कला स्पर्धा, please send email to This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. by April 11, 2019.

For पाककला  स्पर्धा guidelines click here.

 
Vendors please register using link
 
गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लवकरात लवकर Register करा.

 

Where: Mccarthy Middle School, Chelmsford,, MA
When: Saturday, April 13th 2019 @1:30 pm

 

Thank you

मकर संक्रांत कार्यक्रम २०१९

 

नमस्कार मंडळी ,शनिवार दिनांक १९ जानेवारी २०१९ च्या संध्याकाळी  न्यू इंग्लंड मराठी मंडळाचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावेळी तब्बल  ३५० मराठी मंडळींची उपस्थिती होती. मंडळाच्या भगिनीं साठी हळदी कुंकू ,बालकांचे बोरनहाण, बच्चेकंपनी साठी “ Kite Making Craft  Acitivity “ तसेच सर्व कुटुंबाला बघता येतील अश्या तीन एकांकिका असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    फुलापानांनी व “तिळगुळ घ्या गोड गोड  बोला” या संदेशाने सजलेले रजिस्ट्रेशन बूथ  , हलव्याच्या दागिने आणि पतंग यांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून बनवलेले फोटो बूथ, हळदीकुंकू बूथ,संक्रांत वाण याचा  भगिनींनी लाभ घेतला . अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्रमैत्रिणीनीं सोबत फोटोचा आनंद लुटला.

 दरवर्षी प्रमाणे यंदाही पाच वर्षाच्या आतील वयोगटातील बालकांसाठी मंडळातर्फे बोरनहाण करण्यात आले. यावर्षी २५ बालकं या बोरनहाणात सहभागी झाली होती. हलव्याचे दागिने घातलेली छोटी , छोटी मुले सर्वांचे  लक्ष्य वेधून घेत होती. अगदी घरच्यासारखा अनुभव आल्याच्या पालकांनी प्रतिकिया दिल्या.

    कार्यक्रमाची सुरुवात मराठी मंडळाच्या २०१९-२०२० साठी निवड झालेल्या नवीन सदस्यांची ओळख आणि सरत्या समितीच्या सदस्यांच्या आभार प्रदर्शनाच्या  एका छोटेखांनी कार्यक्रमाने करण्यात आली . या वेळी अध्यक्ष ‘ संतोष साळवी ‘ यांनी २०१९ मधील आगामी उपक्रमांची माहिती दिली

   वॉशिंग्टन डीसि च्या कलाविष्कार संस्थेच्या तीन एकांकिका हे संक्रांतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. “मन निरागस हो” हलक्या फुलक्या ढंगाने जाणारी ‘मन आणि बुद्धी ‘ त्यांच्यातील द्वंद्व दाखवणारी  एकांकिका होती.

     ” टॅक्स फ्री “ हि अंध व्यक्तींच्या विश्वातील घटना सादर करणारी एकांकिका सादर करण्यात आली.  यातील सर्व पात्रे आंधळी असल्याने संवादफेक आणि शारीरिक अनुभव उत्तमरीत्या अनुभवायला मिळाला .

    “पुरुषार्थ “ हि दोन भारतीय सेना अधिकाऱ्याच्या देशसेवेचे कर्तव्य पार पडत असताना आलेल्या प्रसंगात देशाचे संरक्षण कि देशाची स्त्रियांप्रती असलेली आदराची भावना , लढाई,मानवी हक्क, देश भक्ती या सर्वांवर भाष्य करणारी एकांकिका सादर करण्यात आली.  या तीनही एकांकिका सर्व प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या.

  तसेच आनंदमेळा हेही एक आकर्षण  होते ..वडापाव, मिसळपाव,रगडा पॅटीस, मटार करंजी,दाबेली, भेळ,पाणी पुरी, आंबा लस्सी , खाण्याचे पान या मराठी खाद्य पदार्थांची रेलचेल होती. सोबतच दागिने,कपडे याही खरेदीचा आनंद अनेकांनी लुटला.

       नवीन समितीच्या वर्ष सुरुवातीच्या  मकर संक्रांतीच्या पहिल्या कार्यक्रमासाठी अनेक मंडळींची, volunteer ची मदत बहुमोलाची होती. त्यांच्या सेवेसाठी आणि प्रतिकूल हवामानातही उपस्थित राहिलेल्या सर्व मराठी सदस्यांची मंडळ सदैव आभारी राहील.  

 

    मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाचे फोटो पाहण्यासाठी  खालील फोटोवर click करा.

 

 

 

        

 

 

 

Anubandh Magazine & Publications

You can also browse and download old issues here.

If you are interested in sending us material for our next issue, please contact Mrs. Seema Kanitkar at This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

 

 

 

 

 

Please click here to browse/download all the issues of BMM Vrutta.