NEMM लायब्ररी

नमस्कार मंडळी ,

NEMM लवकरच घेऊन येत आहे आपली "मराठी लायब्ररी". आम्ही पाचशे अधिक पुस्तके संग्रहित केली आहे. त्यात नामवंत साहित्यकारांचे विविध प्रकारचे साहित्य आहे . कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह, बालसाहित्य, दिवाळी अंक, पाककला, कादंबऱ्या, ऐतिहासिक, अध्यात्मिक, वैचारिक, राजकीय, संत साहित्य, शैक्षणिक, धार्मिक, ललित अशा अनेक प्रकारचे साहित्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत मराठी सिनेमे, नाटकं, लहान मुलांसाठीचे व्हिडीओ, माहितीपट असे इतरही माध्यम निवडीसाठी असणार आहे. 

तुमच्या smartphone वरून पुस्तके निवडता येतील अशी अतिशय सोपी online booking व्यवस्था उपलब्ध आहे. सर्वांच्या सोयीसाठी लायब्ररी चे ठिकाण मध्यवर्ती भागात ठेवणार आहोत. दोन आठवड्यातून एकदा लायब्ररीला प्रत्यक्ष भेट देऊन आपले आवडीचे पुस्तक तुम्हाला घेऊन जात येईल. पुस्तके परत करण्यासाठी Drop Box ची  सोय Acton, Lexington, Chelmsford, Framingham या ठिकाणी करणार आहोत. NEMM सदस्यांसाठी माफक वार्षिक नोंदणी फी मध्ये ही सेवा उपलब्ध ठेवणार आहोत.

तुमच्याजवळील मराठी साहित्य तुम्ही NEMM लायब्ररीला कायमस्वरूपी दान करू शकता. आम्ही त्याची योग्य निगा राखून इतर वाचकांसाठी उपलब्ध करून देऊ. संपर्क करा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it..

अधिक माहिती nemm.org वर लवकरच प्रकाशित करत आहोत. 

 

संपर्क : This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.